नवी दिल्ली: राजधानी परिसर आणि दिल्ली शहराला आम आदमी पक्षाच्या नाकर्तेपणामुळे गॅस चेंबरचे स्वरूप प्राप्त झाल्याची टीका पर्यावरण मंत्री. भूपेंद्र यादव यांनी केला आहे. पंजाबमधील सत्तारूढ ‘ आप’ ने या प्रकरणी घोटाळे केल्याचा आरोपही त्यांनी केला.
सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सातत्याने करत. मात्र यादव यांनी आम आदमी पक्षच या प्रदूषण वाढीला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
यावर्षी काढणीनंतर शेतातील उर्वरित कचरा जाळण्याच्या प्रकारांमध्ये हरयाणा राज्यात ३० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. आम आदमी पक्ष सत्तारूढ असलेल्या पंजाबमध्ये है प्रमाण १९ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळेच दिल्ली आणि उत्तरेकडच्यa राज्यांमध्ये प्रदूषण वाढत आहे, असा आरोप यादव यांनी केला.
पंजाब सरकारकडे शेतीतील प्रदूषणाचे व्यवस्थापन करण्यासाठी २१२ कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी वापरा अभावी पडून राहिला. या वर्षीही या कामासाठी केंद्राने २५० कोटींचा निधी पंजाब सरकारला दिला. त्यातून पिकाचा उर्वरित कचरा जाळण्याची यंत्र घेण्यात आली. मात्र, त्यातील हजारो यंत्र गायब आहेत. त्यामुळे आप सरकारने या निधीत घोटाळा केल्याचे दिसून येत आहे, असेही यादव म्हणाले.