सूर्यकुमार यादव टी-२०चा नंबर वन फलंदाज,पाकिस्तानच्या रिझवानला टाकले मागे

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा ताज्या ICC T20 क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे . आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सूर्यकुमारचे ८६३ रेटिंग गुण आहेत. त्याचबरोबर रिझवानचे ८४२ रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमारने रिझवानवर २१ रेटिंग गुणांची आघाडी कायम ठेवली आहे.

सूर्यकुमार टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला एकूण 23 वा फलंदाज आहे. यासोबतच ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी, विराट कोहली सप्टेंबर 2014 ते डिसेंबर 2017 दरम्यान 1013 दिवस टी-20 मध्ये नंबर वन बॅट्समन होता. 863 रेटिंग पॉइंट हा भारतीय फलंदाजाने मिळवलेला दुसरा सर्वोत्तम रेटिंग पॉइंट आहे. कोहलीने सप्टेंबर 2014 मध्ये 897 रेटिंग गुण मिळवले होते.

सूर्यकुमार यंदा टी-20मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या फॉरमॅटमध्ये तो या वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. त्याने 2022 मध्ये आतापर्यंत 27 सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीने आणि 183.80 च्या स्ट्राइक रेटने 965 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारनेही यंदा शतक झळकावले आहे. त्याने यावर्षी इंग्लंडविरुद्ध 117 धावा केल्या होत्या. या वर्षी सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एक शतक आणि आठ अर्धशतके झळकावली आहेत.