व्हॉटस अप आणि ट्विटरने बंद केली लाखो युजर्सची अकौंटस

इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉटस अप ने सप्टेंबर महिन्यात भारतातील २६.८५ लाखापेक्षा अधिक अकौंटस बॅन केली असून त्यातील ८.७२ लाख अकौंटस युजर्स कडून कोणतीही तक्रार येण्यापूर्वीच बंद केली आहेत. संदेश सेवा मंच कडून मंगळवारी या संदर्भात माहिती देण्यात आली. ऑगस्ट मध्ये व्हॉटस अपने २३.२८ लाख अकौंट बंद केली होती त्यात सप्टेंबर मध्ये १५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या मासिक अहवालात ही माहिती दिली गेली आहे.

सोशल मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरने २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या काळात बाल लैंगिक शोषण, अश्लीलता व अन्य बंदी असलेल्या कंटेंटला प्रोत्साहन देणारी भारतातील ५२१४१ अकौंट बंद केली आहेत. दहशतवादाला समर्थन देणारी १९८२ अकौंट सुद्धा बंद केली गेली आहेत. ट्विटर ने नव्या नियमानुसार २०२१ मासिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार तक्रार निवारण तंत्र माध्यमातून एकाच वेळी भारतातून १५५ तक्रारी नोंदविल्या गेल्याचे आणि त्यातील १२९ केसेस मध्ये कारवाई केली गेल्याचे म्हटले आहे.

नवीन नियमानुसार मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला अहवाल देऊन तक्रारी किती, त्यातील कितींवर कारवाई केली हे सांगायचे आहे. व्हॉटस अपने सप्टेंबर मध्ये ६६६ तक्रारी आल्याचे आणि त्यातील २३ वर कारवाई केल्याचे म्हटले आहे. कुणीही सर्वसामान्य युजर त्यांच्या अकौंटवर असभ्य मजकूर पाठविला जात असेल तर अशी तक्रार करू शकतो. त्यात तथ्य आढळले तर तशी अकौंट बंद केली जातात.