आले वेग वाढविणारे खास बूट

पिटसबर्ग मधील अमेरिकन कंपनी शिफ्ट रोबोटिक्स ने बॅटरीवर चालणारे खास बूट तयार केले असून हे बूट घातले कि चालण्याचा वेग आपोआप वाढतो. या बुटांना ‘मूनवॉकर’ असे नाव दिले गेले आहे. जगातील सर्वाधिक वेगाने चालणारे बूट अशी त्याची प्रसिद्धी केली जात आहे. हे बूट घातले कि चालण्याचा वेग २५० टक्के वाढणार आहे. म्हणजे तुम्ही तासाला अडीच किंवा चार किलोमीटर वेगाने नेहमी चालत असला तर हे बूट घातले कि तुमचा वेग ताशी ७ ते ११ किमीवर जाऊ शकणार आहे.

हे बूट दिसायला सामान्य रोलरस्केटर सारखे दिसतात पण ते वेगळे आहेत. सामान्य बूट घालून आपण चालू शकतोच पण मोटोराईज्ड चाके आपला वेग वाढवितात. त्यासाठी ३०० वॉट ब्रशलेस मोटर दिली गेली असून तिचे वजन १.९ किलो आहे. या बुटाला आठ चाके असून एआय गिअरबॉक्स आहे. यात चालणाऱ्याच्या वेगाचा डेटा गोळा केला जातो. उतारावर चालताना सुद्धा वेगाचे नियंत्रण होते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होते.

कंपनीच सीईओ शून्जी जेंग म्हणाले हे स्केटशूज नाहीत तर ते बूटच आहेत. हे बूट घालून चालण्यासाठी कोणतेही वेगळे प्रशिक्षण घ्यावे लागत नाही.या बुटांची पहिली बॅच मार्च २०२३ मध्ये लाँच केली जाणार आहे. या बुटांची किंमत १ लाख २५ हजार रुपये आहे.