आयफोन १४ प्रो, किंमत फक्त १ कोटी रुपये

अॅपलचा नवा आयफोन १४ प्रो बाजारात येऊन काही दिवस उलटले आहेत आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. आता १ कोटी रुपये किमतीचा, आयफोन १४ प्रो, कॅवीअर या लग्झरी ब्रांडने सादर केला आहे. हा लिमिटेड एडिशन कस्टमाईज्ड फोन असून त्यात खास धातू आणि महागडे हिरे वापरले गेले आहेत. विशेष म्हणजे या फोनच्या बॅक पॅनलवर रोलेक्स घड्याळ आहे. या फोनचे बॅक पॅनल सुपरकारच्या डॅशबोर्ड कंट्रोल पॅनल प्रमाणे दिसते आणि त्यावर शोभिवंत सेन्सर दिले गेले आहेत. या घड्याळाची किंमत १३३,६७० डॉलर्स म्हणजे सुमारे १ कोटी १० लाख रुपये आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर रोलेक्सचे डेटोना घड्याळ दिले गेले असून हे घड्याळ खास रेस चालकांसाठी डिझाईन केले गेले आहे. डेटोना कॅवीअरच्या अपडेटेड कलेक्शन ग्रांड कॉम्प्लीकेशनचा एक भाग आहे. १४ प्रोच्या केस साठी मल्टीबॉडी टायटेनियमचा  वापर केला गेला आहे. शिवाय त्याला पीव्हीडी कोटिंग केले गेले आहे. या कोटिंगचा वापर रोलेक्स ब्लॅक डायल्स, केस व ब्रेसलेट बनविण्यासाठी केला जातो. या घड्याळाला सोन्याचे स्पीडोमीटर व स्विच दिला गेला आहे. गतवर्षी आयफोन १३ व १३ प्रो मॅक्सच्या लिमिटेड एडिशन सुद्धा या लग्झरी ब्रांडने सादर केल्या होत्या.

कॅवीअर लग्झरी ब्रांडचे आयफोन १४ प्रो मॉडेल अॅपल स्टोर मध्ये मिळत नाही असा खुलासा केला गेला आहे.