यंदाचे बॉलीवूड आयफा अॅवॉर्ड अबुधाबी मध्ये होणार

बॉलीवूड आयफा अॅवॉर्ड २०२३ संदर्भातली घोषणा नुकतीच झाली असून यंदा हा सोहळा अबुधाबी मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चन, फरहान खान आणि टीव्ही स्टार मनीष पॉल करणार आहेत.

या विषयी बोलताना अभिषेक म्हणाला,’ यंदाचे हे २३ वे वर्ष आहे . आयफा अॅवॉर्ड सोहळा माझ्यासाठी परिवाराप्रमाणे आहे. या निमित्ताने मनोरंजन करणे, चाहत्यांच्या भेटीगाठी होतात. जागतिक स्तरावरच्या संपर्कासाठी उत्सुक आहे.’ या कार्यक्रमात सलमान खान, वरूण धवन, करन जोहर, कृती सेनन सह अनेक अन्य कलाकार सहभागी होणार आहेत. फरहान खान म्हणाले हा एकमेव असा जागतिक मंच आहे ज्याने जगभर प्रवास केला आहे. ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ दरम्यान हा सोहळा होत आहे. यस बेटावर एटीहाद एरीना येथे हा कार्यक्रम होत आहे.

मनीष पॉल म्हणाला, हा कार्यक्रम नेहमीच देखणा होतो. दर्शकांकडून लाइव प्रतिक्रिया मिळतात. संस्कृती आणि पर्यटन विभाग अबुधाबी व मिरल यांचे सहकार्य त्यासाठी मिळणार आहे.