‘जिम्मी जिमी आजा आजा’… चीनमध्ये रिकामी भांडी दाखवून गायलं जातं बप्पी लाहिरीचं गाणं, जाणून घ्या कारण

कोरोनाविरोधात लादण्यात येणाऱ्या झिरो कोविड पॉलिसीला चीनमधील लोक विरोध करत आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान दिवंगत भारतीय गायक बप्पी लाहिरी यांचे ‘जिम्मी जिमी आजा आजा’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. हे गाणे 1982 मध्ये आलेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील आहे. जर आपण ‘जी मी, जी मी’ असे भाषांतर केले तर त्याचा अर्थ ‘मला भात द्या, मला भात द्या’ असा होतो.

चीनमधील लोकांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लोक रिकामी भांडी दाखवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की लॉकडाऊनमध्ये अन्नटंचाईची स्थिती किती वाईट आहे. चीनमध्ये एकाच कोरोना पॉझिटिव्ह केसची नोंद झाल्यानंतर लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थानांतरित केले जाते.