नवी दिल्ली: पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या ग्रे लिस्ट मध्ये असताना जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात घट झाल्याचे निरीक्षण भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याने नोंदवले आहे. सुरक्षा परिषदेने पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्ये असणे आणि दहशतवादी हल्ल्यात घट यामधील संबंध तपासून पहावे, असे आवाहन भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने केले आहे.
पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या ग्रे लिस्ट मधून बाहेर पडल्यावर जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ले वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याची भीती या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सन २०१४ मध्ये शासकीय कार्यालय, सैन्य आणि पोलीस यांची ठिकाणं लक्ष करूंन ५ हल्ले झाले. सन २०१५ मध्ये ८ हल्ले झाले. सन २०१६ मध्ये १५ दहशतवादी हल्ले झाले. सन २०१७ मध्ये ८ हल्ले झाले. सन २०१८ मध्ये ३ हल्ले झाले.
सन २०१९ मध्ये पुलवामाचा मोठा हल्ला झाला. सन २०२० मध्ये मोठा हल्ला झाला नाही. सन २०२१ पासून पुन्हा दहशतवादी हल्ले सुरू झाले, याकडे संयुक्त सचिव सफी रिझवी यांनी लक्ष वेधले.
सन २०२० मध्ये मोठे हल्ले झाले नाहीत. सन २०१८ ते २१ पर्यंत मोठे हल्ले झाले नाहीत. कारण या कालावधीत पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्ये होता, हे निरीक्षण रिझवी यांनी नोंदवले. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी अभियान राबविण्यात आल्यानंतर आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर देशद्रोही कारवाया कमी झाल्या, असेही त्यांनी नमूद केले.