लीज ट्रस यांचे सर्वात कमी काळ सत्तेत राहण्याचे झाले रेकॉर्ड

ब्रिटनच्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी अवघे ४४ दिवस सत्तेत राहून सर्वाधिक कमी काळ पंतप्रधान राहण्याचे नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. अर्थात कमी काळासाठी पंतप्रधान राहिलेल्या लीस एकमेव पंतप्रधान नाहीत. त्यापूर्वी सुद्धा ब्रिटन मध्ये १ वर्षापेक्षा कमी काळ पंतप्रधान राहण्याचे रेकॉर्ड अनेकांनी केले आहे. अगदी १७५६ सालापासून ही परंपरा सुरु राहिली आहे.

लीज अवघ्या ४४ दिवस पंतप्रधान राहिल्या आहेत. त्या हुजूर पक्षाच्या होत्या. त्यापूर्वी हे रेकॉर्ड जॉर्ज कॅनिगदिन यांच्या नावावर होते. ते १८२७ मध्ये ११९ दिवस टोरी पक्षाकडून पंतप्रधान होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या जागी विस्काऊंट गोडेरिच हे आले. ते १८२७ ते २८ या काळात १४४ दिवस पंतप्रधानपदी राहिले.

बोनारला हे १९२२-२३ या काळात २११ दिवस पंतप्रधान होते आणि तेही हुजूर पक्षाचे होते. ड्युक ऑफ डेवोनशायर विलियम कॅवेडिश यांनी १७५६-५७ या काळात २३६ दिवस पंतप्रधानपद भूषविले होते आणि ते व्हिंग पक्षाचे होते. अर्ल ऑफ बुरे १७६२ मध्ये ३१७दिवस पंतप्रधान होते आणि ते टोरी पक्षाचे होते. सर अॅलेक्स डग्लस होम हे १९६३ मध्ये ३६३ दिवस पंतप्रधान होते. तेही हुजूर पक्षाचे होते.