रिलायंस रिटेल मध्ये होतेय मिठाई विक्री

दिवाळीच्या वेळी मिठाई खरेदी करताना सावधानता बाळगा, भेसळ असण्याची शक्यता आहे असा इशारा ग्राहक संघाकडून दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भेसळ युक्त, शिवाय देशाच्या विविध प्रांतातील खास मिठाई खरेदी करण्याची संधी रिलायंस रिटेल ने उपलब्ध करून दिली असून देशात ५० पेक्षा अधिक दुकानातून ही खास मिठाई विक्री सुरु झाली आहे. या निमित्ताने रिलायंसने ५० हजार कोटींच्या, असंघटीत मिठाई बाजारावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. देशात ‘पॅक मिठाई’ बाजार ४५०० कोटींचा आहे.

रिलायंसने देशाच्या विविध प्रांतात बनणाऱ्या प्रसिद्ध मिठाई राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध करून देण्याची सुरवात केली आहे. यात तीळ बेसन लाडू, घसिटाराम यांचा मुंबई हलवा, प्रभुजी दरवेश, मेथी लाडू, दुध मिष्टान्न भांडारचा मालपुवा, लाल स्वीट्सचा मैसूरपाक, धारवाडी पेढे यांचा समावेश आहे. राजस्थान चवन्नीलाल हलवाईची प्रसिध्द कचोरी आणि चोकलेट बर्फी लवकरच उपलब्ध केली जात आहे.

रिलायंस रिटेलचे सीईओ दामोदर मल्लू म्हणाले रिलायंस रिटेल देशातील सर्वात बडा मल्टी ब्रांड हलवाई बनेल. देशात विविध प्रांतात बनणारी पारंपारिक मिठाई त्या त्या प्रांतातून देशभरात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे आणि छोट्या छोट्या पॅक मधून हे पदार्थ मिळू शकतील.