रोल्स रॉइसची पहिली इव्ही ‘स्पेक्टर’ रिव्हील

ब्रिटीश लग्झरी कार निर्माते रोल्स रॉईसने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार पेश केली आहे. ही पहिली ईव्ही डिसेंबर २०२३ पासून डिलिव्हर केली जाणार आहे. या कारच्या किमती बाबत अजून खुलासा झालेला नाही मात्र तिची किंमत साधारण ६.९५ कोटी रुपये असेल असे समजते. भारतात ही कार ७ ते ९ कोटी रुपयांना मिळू शकेल असा अंदाज केला जात आहे.

ही कार ४.५ सेकंदात ० ते १०० चा वेग घेऊ शकते. ही डबल डोर, चार सीटर कार एका फुल चार्ज मध्ये ५२० किमीचे अंतर कापेल असा दावा केला जात आहे. या कारचे वजन २९७५ किलो असून तिचे शेवटच्या टप्प्यातील टेस्टिंग सुरु आहे. २०२३ अखेरी लाँच झाल्यावर तिच्या स्पेसीफीकेशन मध्ये बदल होऊ शकतील असे सूचित केले गेले आहे. या कारचे दरवाजे मोठे आहेत आणि ग्रील सुद्धा मोठे आहे. इंटीरीअरचा लुक लग्झरीयस आहे. स्प्लीट हेडलाईट आणि रीअर साईडला २२एलईडी लायटिंग दिले गेले आहे.

रोल्स रॉइस कलिनन एसयूवीची किंमत ६.९५ कोटी आणि मायलेज लिटरला ६.६ किमी आहे तर रोल्स रॉइस फँटम एट सेदान ची किंमत ९.५० कोटी आणि मायलेज लिटरला ७.१ किमी आहे. नवी एसयूवी स्पेक्टर या दोन कार्सच्या मधल्या किंमत रेंज मध्ये मिळेल असे सांगितले जात आहे. सीईओ टॉर्सटन मुलर ऑटवॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी २०३० पर्यंत इलेक्ट्रिक कार्सचा पूर्ण पोर्टफोलीओ तयार करणार आहे.