यंदाच्या वर्षात ५.६ अब्ज स्मार्टफोन बनणार कचरा

ई वेस्ट निर्माण करण्यात भारत जगात पाच नंबरवर आहे. देशात दरवर्षी १० लाख ई वेस्ट तयार होती. डिजिटल क्रांती मुळे दर रोज नवनवे स्मार्टफोन बाजारात येत आहेत. वेगाने अपग्रेड होत आहेत. याचा थेट उपद्रव जलवायू आणि पर्यावरणाला होतो. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक कचरा निवारण करणाऱ्या वेस्ट इलेक्ट्रिकल ईक्वीपमेंटच्या रिपोर्ट नुसार या वर्षी भारतातील लोकसंख्येच्या चौपट स्मार्टफोनचा ई कचरा जगात तयार होणार आहे. याचाच अर्थ ५.३ अब्ज फोन कचरा बनणार आहेत किंवा फेकून दिले जाणार आहेत. हा रिपोर्ट बनविताना डब्ल्यूईईएफ जगातील व्यापार आकडेवारीचा आधार घेतला गेला आहे.

जुने फोन नष्ट करण्यामुळे पर्यावरण हानी होते त्यामुळे ते रीसायकल करणे हाच त्यावर उत्तम उपाय आहे. मात्र त्याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक ग्राहक नवे फोन घेतले तरी जुने स्वतः जवळ ठेवतात किंवा फेकून देतात. यामुळे ई वेस्ट वाढते. ई वेस्ट मध्ये संगणकाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे सुमारे ७० टक्के आहे. इलेक्ट्रोनिक उपकरणात अनेक महाग धातू वापरले जातात तसेच शीशे मोठ्या प्रमाणावर असते. यातील फक्त १० टक्के एकत्र केले जातात. खराब स्मार्टफोन मध्ये धातूंचे प्रमाण ६० टक्के असते. आयफोन मध्ये सोने, चांदी, पालेरीयम असे महागडे धातू वापरले जातात. पण मुळात जनजागृती कमी असल्याने त्यातील फार थोडे रीसायकल केले जातात.

जगात आज घडीला १६ अब्ज मोबाईल वापरले जात असून हा आकडा जगाच्या लोकसंख्येच्या दुपटी पेक्षा जास्त आहे. त्यातील एक तृतीयांश फोन वापरलेच जात नाहीत. पुढच्या ७-८ वर्षात ७.४ कोटी टन इलेक्ट्रोनिक कचरा वाढणार असल्याचा इशारा दिला गेला असून त्यात स्मार्टफोन , संगणक यासह अन्य इलेक्ट्रोनिक डिव्हायसेस सुद्धा असतील असे म्हटले जात आहे.