सलमान ड्रग घेतो, आमीरचे माहिती नाही, इति रामदेवबाबा

योगगुरू रामदेवबाबा यांनी मुरादाबाद येथे केलेले एक विधान चर्चेत आले आहे. रामदेवबाबांनी बॉलीवूड आणि अमली पदार्थ या विषयात बोलताना सलमान खान ड्रग्स घेतो, आमीर खानचे माहिती नाही असे म्हटले आहे. मुरादाबाद येथे अमली पदार्थ विरोधी अभियानात रामदेवबाबा बोलत होते. त्यांचे हे विधान वेगाने व्हायरल झाले आहे.

रामदेवबाबा म्हणाले, बॉलीवूड आणि अमली पदार्थ यांचे नाते जुने आहे. बॉलीवूड अभिनेत्यांच्या बद्दल देवालाच सर्व माहिती असेल. अभिनेत्रींची परिस्थिती आणखी वाईट आहे. फिल्म जगतात सर्वत्र ड्रग्स आहेत. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुझ ड्रग प्रकरणात तुरुंगात जावे लागले आणि नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. राजकारणात सुद्धा अमली पदार्थ आहेतच. निवडणूक आली कि दारू वाटली जाते. भारताला नाशेपासून मुक्त करायचे असेल तर आपणच तसे ठरवायला हवे. यासाठी आम्ही आंदोलन सुरु करणार आहोत.

रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर अजून कुठलीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.