यंदाची दिवाळी, मोदी, भारत चीन सीमेवरील जवानांसोबत करणार साजरी

गेल्या आठ वर्षांप्रमाणे यंदाची दिवाळी पंतप्रधान मोदी सीमेवरील जवानांसोबतच साजरी करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी मोदी उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते केदारनाथला भेट देणार आहेत आणि केदारनाथ दर्शन घेऊन तेथील विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्याचं रात्री ते बद्रीधाम ला रवाना होणार आहेत. दुसरे दिवशी बद्री दर्शन करून तेथील विकास योजनांची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर ते बद्रीपासून तीन किमीवर असलेल्या भारत चीन सीमेवरील भारताच्या हद्दीतील शेवटचे गाव माणा येथे भेट देणार असून तेथील सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. हे गाव समुद्र सपाटीपासून १८ हजार फुट उंचावर आहे. पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मोदी दिवाळी नेहमीच सीमेवरील जवानांसोबत साजरी करत आले आहेत.

२०१६ मध्ये मोदींनी हिमाचल मधील चांगो गावात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१७ मध्ये जम्मू काश्मीर मधील गुरेज व्हॅली मध्ये, २०१८ उत्तराखंडच्या हर्सील येथे, २०१९ पुन्हा जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे, २०२० मध्ये राजस्थानच्या लोंगोवाल सीमेवर तर २०२१ मध्ये जम्मूच्या नौशेरा येथे दिवाळी साजरी केली होती.