या देशातील लोक जगात सर्वाधिक गोरे

आपल्याकडे एक म्हण आहे, ‘एक गोरी, हजार गुण चोरी’ म्हणजे लग्नाची मुलगी गोरी असेल तर तिचे बाकीचे अवगुण कुणी फारसे पाहत नाही. गोरेपणाचे वेड ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही तर जगात सगळीकडे गोरेपणाची क्रेझ आहे. वर्ण गोरा व्हावा यासाठी अनेक प्रकारची क्रीम्स, लोशन, ट्रीटमेंट घेतल्या जातात आणि त्यावर मोठा खर्च केला जातो. आपल्याकडे सर्व साधारणपणे पाश्चिमात्य म्हणजे इंग्लंड, अमेरिकेतील लोक गोरे असे मानले जाते. पण जगातील सर्वधिक गोरे लोक असणारा देश आहे आयर्लंड.

सर्वात विशेष म्हणजे आयर्लंड मधील नागरिक सर्वाधिक गोरे असण्याचा संबंध कदाचित भारताशी आहे असे मानले जाते. आयरिश लोकांच्या जीन्स मध्येच गोरेपण आहे पण तेथील हवामान सुद्धा गोरेपणाला अनुकूल आहे कारण तेथे युव्ही रेडीएशन अगदी कमी आहे. युएस मधील पेनसिल्वानिया विद्यापीठातील संशोधन सांगते, गोरेपण एसएलसी -२४ ए ५ अन्वाचे जनुक ठरवते. त्यात म्युटेशन झाले कि हे गोरेपण किती अधिक असेल ते ठरते. आयर्लंड मधील म्युटेशन ‘ए १११ टी’ असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे त्वचा फिकट रंगाची होते.

हे जेनेटिक कोड एकाच व्यक्तीपासून बनले असल्याचे सांगितले जाते. अर्थात ही व्यक्ती कोण असावी हे सांगणे अवघड आहे मात्र १० हजार वर्षापूर्वी ही व्यक्ती भारत किंवा मध्यपूर्वेचा रहिवासी असावा असा संशोधकांचा दावा आहे. त्याचे वंशज हे जनुक घेऊन इबेरिया प्रायद्विपातून आयर्लंड मध्ये आले असावेत असे मानले जाते.

खुद्द आयरलंड मधील रहिवाश्यांना मात्र त्यांचे हे अत्याधिक गोरेपण फारसे आवडत नाही. फार गोरेपणा मुळे आकर्षण कमी होते अशी त्यांची भावना आहे. यामुळे येथील १० पैकी एक  महिला मेकअप, सन टॅन लोशन व सन बॅन्ड वापरतातच. या तिन्हीमुळे त्वचा थोडी गडद होते. येथील ५२ टक्के महिला रिलेशनशिप मध्ये जाण्यापूर्वी दोन आठवडे अगोदर आपला रंग गडद करून घेतात असेही सांगितले जाते.