अचूक ब्लड प्रेशर मोजणारा टॅटू

ऑस्टिन मधील टेक्सास विद्यापीठ आणि टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सीटी मधील वैद्यानिकांनी एक असा टॅटू बनविला आहे जो ३०० मिनिटे अचूक बल्डप्रेशर दाखवू शकतो. बायोमेडिकल इंजिनिअरीग, संगणक अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे प्रोफेसर रूजबेह जाफरी यांनी या तंत्राला कफलेस ब्लडप्रेशर टेक्नोलॉजी असे म्हटले आहे.

आजकाल तरुणवयातच अनेकांना ब्लड प्रेशरची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे ब्लड प्रेशरवर  सतत नजर ठेवावी लागते. जगात ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. यामुळेच कदाचित आजकाल घराघरातून ब्लड प्रेशर मोजणारी यंत्रे दिसू लागली आहेत. हृदयरोग, मूत्रपिंड विकार, मधुमेह यांचा थेट ब्लड प्रेशरशी संबध आहे. स्मार्टफोन मधून सुद्धा त्यामुळे ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवणारी फीचर्स दिली जात आहेत. मात्र यात लाईट सेन्सरचा वापर केलेला असतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशरचे दाखविले गेलेले आकडे अचूक येत नाहीत. थोडेफार मागेपुढे असतात.

हा ई टॅटू लावला कि ब्लड प्रेशर चेक करत बसावे लागत नाही. झोपेत, जागेपणी, व्यायाम करताना, स्ट्रेस खाली असाल तरी दरवेळी तुमचे ब्लडप्रेशर मोजले जाते. या टॅटू मध्ये बसविलेला सेन्सर वेटलेस आहे. तुम्ही तो पाहू शकत नाही. हा सेन्सर इकडे तिकडे हलत नाही. हा टॅटू आपण अन्य टॅटू चिकटवितो तसा चिकटवायचा असून तो वॉटर प्रुफ आहे. चोवीस तास तो लावता येतो. ग्रॅफिन पासून तो बनविला गेला आहे. हा टॅटू त्वचेत इलेक्ट्रिक करंट शूट करतो आणि ब्लड प्रेशर मोजतो असे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही