मेरडोना फेम ‘ हँड ऑफ गॉड’ फुटबॉलमुळे रेफ्री होणार मालामाल

मेरडोनाच्या ‘त्या’ जादुई गोल’ मध्ये वापरला गेलेल्या फुटबॉलमुळे त्या वेळचे रेफरी, ट्युनिशियाचे अली बिन नासीर मालामाल बनणार आहेत. १९८६ च्या फुटबॉल विश्वकप मध्ये आर्जेन्टिनाच्या दिग्गज फुटबॉलपटू डीयागो मेरडोनाने हाताने बॉल मारून केलेल्या गोलने आर्जेन्टिना विश्वविजेता ठरला होता. हा गोल हाताने केल्याचे सामना रेफ्री अली बिन नासीर यांच्या नजरेतून सुटले आणि इंग्लंडने या गोलला विरोध करूनही रेफ्री आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. मेराडोनाने नंतर हा गोल बॉल हाताला लागून झाल्याचे मान्य करून त्याला ‘हँड ऑफ गॉड’ असे म्हटले होते.

रेफ्री नसीर यांच्या हातून ३६ वर्षापूर्वी झालेली ही चूक आता मात्र यांच्या फायद्यावर पडणार आहे. हा फुटबॉल नासीर यांच्याकडे आहे. हा फुटबॉल आता लिलावात विकला जाणार आहे. कतार येथे होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कप पूर्वी चार दिवस म्हणजे १६ नोव्हेंबरला हा लिलाव ब्रिटन मध्ये होणार आहे. त्यात या बॉलला २७ ते ३३ लाख डॉलर्स म्हणजे २७ कोटी रुपयांची बोली लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या गाजलेल्या सामन्यातील मेराडोनाशी संबंधित अन्य वस्तू पूर्वीच लिलावात विकल्या गेल्या आहेत. मेराडोनाचा या सामन्यातील शर्ट,  मे मध्ये ९३ लाख डॉलर्स ना विकला गेला आहे. या फुटबॉल विषयी बोलताना नसीर म्हणाले,’ हा चेंडू आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहासाचा भाग असून त्याच्या लिलावाची ही योग्य वेळ आहे.’