बीटकॉईनला मागे टाकणार इथेरीयम?

क्रीप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन जगात येऊन आता बराच काळ लोटला आहे आणि आता या आभासी चलनाचा बाजार किंवा मार्केट सुद्धा सुरु झाले आहे. या मार्केट मध्ये सुरवाती पासूनच बीटकॉईनचा दबदबा असून आजही याच बीटकॉईनचे अधिराज्य या क्रीप्टोकरन्सी मार्केट वर आहे. मात्र लवकरच दोन नंबरचे इथेरियम हे आभासी चलन बीटकॉईनला मागे टाकून एक नंबर पोझिशन घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रॉयटर्सच्या बातमीनुसार काही दिवसातच इथेरीयम एक सोफ्टवेअर अपडेट योजना आणत आहे. इथेरीयम फौंडेशनने त्याला इथेरीयम मर्ज म्हटले असून हा कार्यक्रम पार पडल्यावर इथेरियमच्या किमती वधारतील. डेटा प्लॅटफॉर्म कॉईनमार्केट कॅप नुसार बीटकॉईन चे दर यंदाच्या जून पासून ४७.५ टक्क्यांनी घसरले आहेत. दुसरी कडे इथेरियम चे दर १६ टक्क्यांनी वाढले असून ते २०.५ टक्क्यांवर गेले आहेत. २०२१ मध्ये बीटकॉईनचेच वर्चस्व होते आणि त्यांचा दर ७२ टक्के तर इथेरीयमचा १० टक्के होता. इथेरियम नेटवर्कला मिळत असलेले यश पाहता ग्राहक इथेरियम ला सुद्धा सुरक्षित संपत्ती रुपात पाहू लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इथेरियम मर्ज बुधवारी झाले तर इथेरियमची किंमत वाढेल असे म्हटले जात आहे. तरीही इथेरीयम अद्यापी बीटकॉईनच्या खूप मागे आहे. बाजारात बीटकॉईनची मार्केट कॅप ४२७ अब्ज डॉलर्स आहे तर इथेरीयमची मार्केट कॅप २१० अब्ज डॉलर्स आहे. पण एकूण परिस्थिती पहिली तर गुंतवणूकदारांचा इथेरीयम मधील रस वाढत असल्याचे दिसून आले आहे.