ओमिक्रोन एक्सबीबी व्हेरीयंट महाराष्ट्रासह अन्य तीन राज्यात आढळला

ऑगस्ट मध्ये प्रथम सिंगापूर सापडलेला आणि अमेरिकेत डिटेक्ट झालेला करोना ओमिक्रोनचा सब व्हेरीयंट आता भारतात सुद्धा आला आहे. गेल्या १५ दिवसात ओमिक्रोन एक्सबीबीच्या बीए.२.७५ व बीजे.१ व्हेरीयंटच्या ७१ केसेस भारतात आढळल्या आहेत. ओरिसा मध्ये ३३, प.बंगाल मध्ये १७, तामिळनाडू मध्ये १६ केसेस आढळल्या आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी या व्हेरीयंटच्या ५ केसेस आढळल्या आहेत. हे व्हेरीयंट इम्युनिटीवर मात करण्यास सक्षम आहे पण ते रुगांच्या गंभीर आजारास कारण बनू शकते का हे अजून समजलेले नाही.

सिंगापूर मध्ये एक्सबीबी व्हेरीयंटचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.  तेथील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही रुग्णांना हॉस्पिटल मध्ये हलवावे लागले असले तरी त्यांच्यात गंभीर परिणाम अजून तरी दिसलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ओमिक्रोन चिंतेचे कारण आहे. भारतात जीनोम सिक्वेन्सिंग मध्ये सामील असलेल्या वैज्ञानिकांच्या मते देशात ८८ टक्के नवीन संक्रमण बीए.२.७५ चे आहे आणि एकूण केसेस मधील ७ टक्के केसेस एक्सबीबी मुळे आहेत. महाराष्ट्र जीनोम सिक्वेन्सिंग समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार एक्सबीबी हा हायब्रीड व्हेरीयंट आहे. त्याच्या प्रसारावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. या व्हेरीयंटचा सर्वाधिक प्रभाव सध्या सिंगापूर मध्ये आहे.