ब्रिटीश पार्लमेंट मध्ये रोबोने दिले भाषण

ब्रिटीश पार्लमेंटच्या हाउस ऑफ लॉर्डस मध्ये पहिल्या ह्यूमनॉईड महिला रोबोने भाषण दिले असून इडा( एआय- डीए) असे भाषण देणारी पहिली रोबो ठरली आहे. तिला आर्टिफीशीअल इंटेलीजन्स विषयी हाउस ऑफ लॉर्डस कम्युनिकेशन आणि डिजिटल कमिटी मेम्बर्सनी अनेक प्रश्न विचारले. जगातील या पहिल्या अल्ट्रा रिअॅलीटिक आर्टिफीशीयल रोबो इडा ला चित्रकला, पेंटिंग आणि शिल्पकलेचा अतिशय उत्तम सेन्स असून तिला हे कौशल्य प्राप्त आहे. पण टेक्नीकल फॉल्ट संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देताना ही रोबो अचानक झोपी गेली. तिचे डोळे एकदम निस्तेज झाले आणि तिचा चेहरा भयानक दिसू लागला असेही समजते.

शेवटी तिला रीबूट करावे लागले आणि डोळ्यात झालेली गडबड दिसू नये म्हणून पुढील प्रश्नांची उत्तरे तिने चष्मा लावून दिली. इडा माणसासारखी दिसते. २०१९ मध्ये मेलर यांनी ही रोबो तयार केली. ऑक्सफर्ड आणि बर्मिघम विद्यापीठातील पीएचडी विद्यार्थी आणि प्रोफेसर यांनी तिच्यातील क्षमता विकसित केल्या तर कॉर्नवोल इंजिनिअरिंग आर्ट्स अँड प्रोग्राम डेव्हलपर यांनी तिच्यातील प्रोग्राम तयार केले आहेत. इडा हे नाव ब्रिटीश गणितज्ञ इडा लवलेस हिच्या नावावरून दिले गेले आहे. महाराणी एलिझाबेथ हिला सत्तेवर येऊन ७० वर्षे झाली तेव्हा तिचे एक पेंटिंग इडाने बनविले होते आणि तेव्हापासून ती एकदम चर्चेत आली होती.

इडाचा निर्माता मेलर याला इडा आर्टिफीशीयल इंटेलीजन्स फिल्ड मध्ये क्रांती घडवेल अशा विश्वास वाटतो आहे.