मुलायम सिंग यांनी मागे ठेवली इतकी संपत्ती आणि इतके कर्ज

समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशच्या राजकारणातील भीष्म मुलायम सिंग यादव यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले गेले आहेत. मुलायम सिंग यांनी राजकीय वारसा बरोबरच मागे किती संपत्ती आणि किती कर्ज ठेवले आहे याची चर्चा आता सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना अर्जात मुलायम सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती १६ कोटी ५२ लाख,४४ हजार ३०० रुपये आहे. मुलायम आणि त्यांच्या पत्नी साधना यांची वार्षिक कमाई ३२.०२ लाख रुपये असल्याचे त्यात नमूद केले गेले आहे. मुलायम यांच्या नावावर कार नाही. मुलायम सिंग यांनी मुलगा अखिलेश यांच्या कडून २ कोटी १३ लाख ऐशी हजार रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र ते कोणत्या कारणासाठी घेतले गेले याची माहिती मिळू शकलेली नाही.

मिडिया रिपोर्ट नुसार मुलायम यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात ३ कोटींनी कमी झाली होती. २०१४ च्या निवडणूक उमेदवारी अर्जानुसार त्यांची संपत्ती १९ कोटी ७२ लाखांवर होती. पुढच्या निवडणुकीत ती १६ कोटींवर आली. गेली ५० वर्षे राजकारणात असलेल्या मुलायम सिंग यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. त्यांच्या गावी त्यांची ७ कोटींची शेतजमीन आणि १० कोटी किमतीची बिगर शेत जमीन आहे. त्यांचे उत्पन्न प्रामुख्याने शेती आणि लोकसभा तनखा यातूनच होते असे त्यांचे म्हणणे होते.