एलोन मस्क यांनी लाँच केला ‘बर्न्ट हेअर’ परफ्युम

जगातील नंबर एकचे श्रीमंत, टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी नुकतेच ‘ बर्न्ट हेअर’ नावाचे परफ्युम लॉंच केले आहे. त्यानंतर त्यांनी त्वरित आपल्या ट्वीटर बायो मध्ये चेंज करून तेथे परफ्युम सेल्समन असा बदल केला आहे. हा पृथ्वीवरचा सर्वात सुंदर सुगंध असल्याचे सांगतानाच त्यांनी लाँच होताच चोवीस तासात यांचा १० लाख बाटल्या विकल्या गेल्याचे सुद्धा नमूद केले आहे.

मस्क या संदर्भात ट्वीट करताना म्हणतात, ‘माझ्या सारख्या नावाच्या माणसाने सुगंघ व्यवसायात येणे आवश्यक होते.’ मस्क यांनी त्यांच्या ब्रांड द बोरिंग कंपनीच्या माध्यमातून हा परफ्युम सादर केला आहे. कंपनीच्या वेबसाईटवरून याची विक्री केली जात असून या परफ्युमची किमंत १०० डॉलर्स म्हणजे ८४०० रुपये आहे. क्रीप्टो करन्सी देऊन सुद्धा या बाटलीची खरेदी करता येणार आहे. हा परफ्युम छोट्या लाल रंगाच्या बाटलीमध्ये असून त्यावर चंदेरी रंगात इंग्रजी कर्सिव्ह अक्षरात नाव लिहिले गेले आहे.

या परफ्युम संदर्भात मस्क यांनी सप्टेंबर मध्ये एक ट्वीट केले होते. त्यात ‘पुरुषांसाठी बोरिंग कंपनी एक सुगंध लाँच करत आहे. यामुळे गर्दीतून दूर उभे राहण्यास मदत होईल असे म्हटले गेले होते. मस्क यांनी डीपीवर परफ्युम सेल्समन असा स्वतःचा जो उल्लेख केले आहे ती त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटीजी असल्याचे म्हटले जात आहे.