भगवान चित्रगुप्ताचा अपमान केल्याचा आरोप करत ‘थँक गॉड’ चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका


25 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. श्री चित्रगुप्त वेलफेअर ट्रस्ट नावाच्या संस्थेने म्हटले आहे की, यामुळे भगवान चित्रगुप्ताची पूजा करणाऱ्या जगभरातील करोडो कायस्थ लोकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळायला नको.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन व्यतिरिक्त याचिकाकर्त्याने दिग्दर्शक इंदर कुमार, निर्माता भूषण कुमार आणि अभिनेता अजय देवगण यांना पक्षकार बनवले आहे. देवगणने या चित्रपटात चित्रगुप्ताची भूमिका साकारली आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुलप्रीत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटाच्या ट्रेलरवरून हे स्पष्ट होते की चित्रगुप्त यांना अपमानास्पद पद्धतीने दाखवण्यात आले आहे आणि त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर संस्थेने निर्मात्याला पत्र लिहिले. इंटरनेटवरून ट्रेलर काढून टाकण्याची विनंती केली. तसेच चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

यापूर्वीच दाखल करण्यात आला आहे गुन्हा
यापूर्वी, दिग्दर्शक इंद्र कुमारच्या दिवाळीत रिलीज झालेल्या थँक गॉड या अजय, सिद्धार्थ आणि रकुल प्रीत सिंग यांच्या विरोधात जौनपूर न्यायालयात अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्याविरुद्ध धर्माची थट्टा आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कायदेशीर खटला दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनीही याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा​यांच्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली होती.