१० वर्षापूर्वी काढले असेल आधार कार्ड, तर करून घ्या अपडेट

युआयडीएआयने ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून १० वर्षे झाली आणि या काळात कधीच ते अपडेट केले नसेल अश्या नागरिकांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असे सांगितले आहे. ठराविक शुक्ल आकारून आधार कार्ड अपडेट करण्याची ऑनलाईन सुविधा सुद्धा दिली गेली आहे. अथवा जवळच्या आधार केंद्रावर हे काम करता येणार आहे.

आधार धारकासाठी हे वैध ओळखपत्र असून पत्ता बदल झाला असले, फोन नंबर बदलला असेल तर तो अपग्रेड करायला हवा असे सांगून अधिकारी म्हणाले, अनेक वृद्ध नागरिकांच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिकवर येत नाहीत. आधार अपडेट करताना डोळ्याचे स्क्रीनिंग, फोटो यांचा वापर करता येतो. आधारचा वापर विविध सरकारी योजना,सेवा मध्ये लाभ घेण्यासाठी होतो त्यामुळे ते अपडेट असणे आवश्यक आहे. यामुळे लाभार्थींची गैरसोय टाळता येते. या बदलांसाठी २५ रुपये शुल्क आकारले जाते आणि त्याची रिसीट दिली जाते असेही त्यांनी सांगितले.