देशातील पहिली फ्लेक्स फ्युअल कार , गडकरींनी केली ड्राईव्ह

देशातील पहिली फ्लेक्स फ्युअल हायब्रीड कार ह्युंदाईने सादर केली असून ही कार इथेनॉल आणि इलेक्ट्रिक अशी दोन्ही इंधनावर चालू शकणार आहे. टोयोटा करोला अल्टीस असे या कारचे नाव असून तिला १.८ लिटरचे इथेनॉल गॅसोलीन हायब्रीड इंजिन दिले गेले आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर या प्रकल्पाचे काम सुरु केले गेले असून त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. गडकरी यांनी स्वतः ही कार ड्राईव्ह केली.

या कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार मालक त्याला हवे तेव्हा कुठल्याही वेळी कार इथेनॉल वरून इलेक्ट्रिक वर व इलेक्ट्रिक वरून इथेनॉलवर शिफ्ट करू शकतो. भारतात सध्या वीज व इथेनॉलचे दर अन्य देशांच्या तुलनेत कमी आहेत त्यामुळे या गाड्या पेट्रोल कार पेक्षा कमी खर्चात चालविता येतात. शिवाय प्रदूषण कमी होत असल्याने पर्यावरण रक्षणासाठी त्याचा उपयोग होतो.

या वेळी केलेल्या भाषणात गडकरी म्हणाले,’पंतप्रधान मोदींनी भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सवर नेण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न सत्यात येण्यासाठी कृषी क्षेत्रात १०० टक्के वाढ होणे आवश्यक असून कृषी विभागाची वाढ इथेनॉल शी जोडलेली आहे. इथेनॉल कृषी मालाच्या वाया जाणाऱ्या भागापासून बनते त्यामुळे हा वाया जाणारा भाग जाळून टाकला जात नाही. त्यामुळेही पर्यावरणाचे रक्षण होते.’

फ्लेक्स फ्युएल कार म्हणजे पेट्रोल आणि इथेनॉलचे मिश्रण आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या कार्स कॅनडा, युएस मध्ये वापरल्या जात आहेत. इथेनॉल हे तुलनेने स्वस्त आणि स्वच्छ इंधन आहे. भारताने सुद्धा फ्लेक्स फ्युएल निर्मिती सुरु केली असून ई ९५, ई ९०, ई ८५ असे हे प्रकार आहेत. यात इथेनॉल आणि पेट्रोल ठराविक रेशो मध्ये एकत्र केले जाते.