अखेर आनंद महिंद्र यांना नव्या गाडीसाठी मिळाले नाव 

महिंद्र आणि महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी नवी स्कोर्पियो एन गाडी नुकतीच खरेदी केल्यावर त्यांना या गाडीसाठी नवे नाव मिळाले आहे. स्कोर्पिओ एनची डिलिव्हरी मिळाल्याचे ट्वीट करताना आनंद यांनी या नव्या गाडीसाठी छान नाव सुचवा असे अपील त्यांच्या फॉलोअर्सना सोशल मिडिया वरून केले होते. ट्वीटरवर महिंद्र यांचे ९८ लाख फॉलोअर्स असून त्यातील बऱ्याच जणांनी महिंद्र यांच्या नव्या गाडीसाठी विविध नावे सुचविली होती.

या अनेक नावातून महिंद्र यांनी भीम आणि बिच्छू (विंचू) ही दोन नावे निवडली आणि त्यावर मतदान घेतले. भीम नावाला सर्वाधिक पसंती मिळाली. आनंद महिंद्र म्हणाले, ‘भीम ला स्पर्धाच नव्हती. भीम विजेता आहे. मेरा लाल भीम’. नाव सुचविल्याबद्दल धन्यवाद. एकूण ७७८६२ युजर्सनी या नाव निवडीत सहभाग घेतला होता. त्यातील ७७.१ टक्के युजर्सनी भीम ला पसंती दिली.

३० जुलै २०२२ मध्ये नव्या स्कोर्पिओ एन साठी बुकिंग सुरु झाले आणि दीड तासात १ लाख गाड्यांसाठी बुकिंग झाले. या गाडीची एक्स शो रूम किंमत ११.९ लाखापासून २३.९० लाख अशी आहे. महिंद्राने २००२ मध्ये स्कोर्पीओ लाँच केली आणि कंपनीने व्यवसायात एक नवी उंची गाठली . महिंद्रच्या वाहनात, युटीलीटी व्हेईकल मध्ये एस अक्षर जोडले गेले. स्कोर्पिओ नंतर एसयूव्ही सेगमेंट मध्ये महिंद्रने भक्कम पाय रोवले आणि आजही या गाड्यांची क्रेझ कायम आहे. एसयुव्ही सेगमेंट मध्ये सर्वाधिक विक्री होणारी गाडी स्कोर्पिओ आहे. याच गाडीचे फेसलिफ्ट व्हर्जन एन आता बाजारात आले आहे.