ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची विजयी सुरुवात, पहिला सराव सामना सहज जिंकला, सूर्यकुमार आणि अर्शदीपचा चमत्कार


ऑस्ट्रेलियात 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत असलेल्या टीम इंडियाने आज पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांनी चमकदार कामगिरी केली.

टीम इंडियाने प्रथम खेळून 20 षटकात 6 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावा करू शकला.

भारताकडून सूर्यकुमारने अवघ्या 35 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने महत्त्वपूर्ण 29 धावा केल्या. याशिवाय दीपक हुडाने 22 आणि दिनेश कार्तिकने 19 धावांचे योगदान दिले.

या सामन्यात रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. मात्र, दोघांनीही फलंदाजीत काही कमाल केली नाही. रोहितने 3 आणि पंतने 9 धावा केल्या. अर्शदीप सिंगने गोलंदाजीत कमाल केली. अर्शदीपने एकूण तीन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारला दोन यश मिळाले.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली सहभागी झाले नव्हते. दीपक हुडाने 14 चेंडूत 22 तर हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 29 धावा केल्या.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन प्लेइंग 11: डी’आर्सी शॉर्ट, अॅरॉन हार्डी, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट (डब्ल्यू), अॅश्टन टर्नर (सी), सॅम फॅनिंग, हॅमिश मॅकेन्झी, झाय रिचर्डसन, अँड्र्यू टाय, जेसन बेहरेनडॉर्फ, मॅथ्यू केली, निक हॉबसन.

भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.