म्हणून दिले जात नाही गणिताचे नोबेल

वर्ष २०२२ ची सर्व नोबेल पारितोषिके घोषित झाली आहेत. नोबेल पुरस्कार सहा श्रेणी मध्ये दिला जातो. साहित्य, फिजिक्स, रसायन, शांतता, अर्थ आणि फ़िजिओ मेडिसिन अश्या या श्रेणी आहेत. गणित हा इतका महत्वाचा विषय आहे मात्र गणिताचे नोबेल दिले जात नाही. या विषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात.

त्यातील मुख्य कहाणी म्हणजे आल्फ्रेड नोबेल याला गणिताची नफरत होती कारण त्याची प्रेयसी एका गणितज्ञाने पळविली होती असे सांगतात. अलफ्रेडची अनेक प्रेम प्रकरणे झाली पण तो शेवटपर्यंत अविवाहितच राहिला होता. असे सांगतात त्याची प्रेयसी सोफी १८ वर्षे आल्फ्रेड बरोबर रिलेशनशीप मध्ये होती पण अखेर तिने त्याला सोडून स्वीडिश गणितज्ञ गोस्टा लेफलर याच्याबरोबर अफेअर केले आणि नोबेलला सोडून सोफी या गणितज्ञाकडे गेली. लेफलर यानेच सोफी बरोबर अफेअर केले अशी शंका नोबेल याला होती. त्यामुळे त्याने गणित या विषयात नोबेल पारितोषिक देण्याच्या कधीच विचार केला नाही.

अर्थात आल्फ्रेड नोबेल याने सर्वप्रथम अलेक्झांड्रा या मुली समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला होता पण तिने आल्फ्रेड ला नकार दिल्याने त्याचा हृदयभंग झाला. मग त्याने त्याची सेक्रेटरी बर्था किंसे हिच्यावर प्रेम केले. पण आजूबाजूचे लोक याला अॅडजस्टमेंट म्हणत. किंसे काही दिवसात आल्फ्रेडला कंटाळली आणि तिने त्याला सोडून तिचा जुना प्रेमिक ब्रेओन आर्थर याच्या बरोबर विवाह केला. पण या नंतर सुद्धा आल्फ्रेड आणि किंसे यांची मैत्री होती.

या नंतर सोफी सोबत आल्फ्रेड १८ वर्षे रिलेशनशिप मध्ये होता पण अखेर सोफी त्याला सोडून गणितज्ञ लेफलर याच्याकडे गेली असा प्रवाद आहे. दुसरे असेही सांगतात की आल्फ्रेड नोबेल याला गणितात अजिबात रस नव्हता. जगाला फायदा होईल असे नवे संशोधन, नवे शोध यात त्याला रस होता. तो स्वतः संशोधक होता आणि गणित फार थिअरॉटीकल आहे असे त्याचे मत असल्याने त्याने पारितोषिके देताना गणिताचा विचार केला नव्हता.