रणबीर घेतोय पेरेन्टल लिव्ह, बाळांना सांभाळणार

बॉलीवूड मधील सध्याचे चर्चित कपल आलीया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आईबाबा बनत आहेत. आलीयाला जुळे होणार असल्याची चर्चा आहे. रणबीरने नवजात बालकांच्या संगोपनासाठी दीर्घ सुट्टी घेतली असल्याचे त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले आहे. रणबीरने सध्या कुठलाही नवा चित्रपट स्वीकारलेला नाही असे त्याचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाळंतपणानंतर आलियाला लगोलग कामावर जावे लागणार आहे. तिच्या रॉकी राणी कि प्रेम कहाणीचे काही शुटींग बाकी आहे. तसेच त्या पाठोपाठ संजय लीला भन्साळीच्या बैजू बावराचे शुटींग लगेच सुरु होणार आहे. अश्यावेळी बाळाची जबाबदारी रणबीर घेणार आहे. एका मुलाखतीत रणबीर आणि आलियाने मुलांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे, स्वागताची सर्व तयारी झाली आहे, त्यांची खोली तयार आहे असे सांगितले होते.

रणबीरने अॅनिमल नंतर नवा चित्रपट स्वीकारलेला नाही. तो म्हणाला,’वडील बनायची भावना मी प्रथमच अनुभवणार आहे. आम्ही लहान होतो तेव्हा माझे वडील कामानिमित्त नेहमी बाहेर असत. आईने आम्हाला वाढवले. आपण बाबा बनणार याची उत्सुकता, आनंद आहे पण त्याचबरोबर काहिशी भीती, नव्हर्सनेस सुद्धा आहे. लहान बाळाला मला घेता येत नाही. पण आलीया आणि मी ही जबाबदारी वाटून घेणार आहोत. आम्ही दोघेही काम करतो त्यामुळे केवळ बाळ झाले म्हणून आलीयाने तिचे करियर थांबविण्याचे कारण नाही. तिच्या स्वप्नांचा त्याग तिला करायला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत.