IND vs SA : वॉशिंग्टन सुंदरची टीम इंडियात एंट्री, दीपक चहर दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर


नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारताने वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात चहरला दुखापत झाली होती. यानंतर, तो एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला नाही आणि आता संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. सुंदरची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी ठरली आहे. याच कारणामुळे त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला.

बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून दीपक चहरच्या बदलीची घोषणा केली. बोर्डाने ट्विटमध्ये लिहिले की, दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, इंदूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात दीपक जखमी झाला. या कारणामुळे त्याला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते. हा सामना लखनौमध्ये खेळला गेला.


विशेष म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळला गेला. यामध्ये भारताला 9 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुढचा सामना 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे.

भारताचा एकदिवसीय संघ: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.