रशियाचे नवे बॉम्बर आहे महाविनाशक

रशियाच्या पीएके- डीए हे स्ट्रॅटीजिक बॉम्बर निर्मिताला वेग दिला गेला आहे आणि यामुळे पुतीन यांनी दिलेली अण्वस्त्र हल्ले धमकी दुर्लक्षून चालणार नाही असे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. रशियाचे हे पहिले पूर्ण रूपातील स्टील्ट बॉम्बर कुठल्याच रडारवर टिपता येणार नाही असे सांगितले जात आहे. या विमानात बसविण्यात येणाऱ्या उपकरणांचे टेस्टिंग वेगाने सुरु केले गेले असून अमेरिकेची कोणतीही मिसाईल डिफेन्स सिस्टीम ती पकडू शकणार नाही असा दावा केला जात आहे. या विमानातून अण्वस्त्रासहित अनेक प्रकारची ड्रोन डागता येणार आहेत.

रशिया रिसर्च अँड प्रोडक्शन इंटरप्रायझेस ज्वेज्दा नुसार या बॉम्बरची दीर्घ पल्ला मारा करण्यची क्षमता असून पायलटच्या बचावासाठी मोठे पॅराशूट खास डेव्हलप केले गेले आहे. या बॉम्बरमध्ये चार पायलट उड्डाण करू शकणार आहेत त्यासाठी नवी इजेक्शन सिस्टीम बनविली गेली आहे. हे बॉम्बर सलग ३० तास उड्डाण करू शकते आणि अमेरिकेच्या बी २ स्पिरीट पेक्षा जास्त अंतरावर मारा करू शकते.

२०२० मध्येच या बॉम्बरची निर्मिती सुरु केली गेली होती.२०२३ मध्ये हे बॉम्बर तयार होईल आणि सर्व आवश्यक चाचण्या यशस्वी झाल्या कि त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणवर सुरु केली जाईल. रशिया त्यांची जुनी लढाऊ विमाने त्यानंतर उपयोगातून काढून टाकणार आहेत असेही सांगितले जात आहे.