Nobel Peace Prize 2022 : मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिल्यात्स्की यांच्यासह रशिया-युक्रेनमधील दोन संस्थांना शांततेचा नोबेल पुरस्कार


2022 चा नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी (7 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आला. यावेळी एका मानवाधिकार कार्यकर्त्यासह दोन संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने बेलारूसी मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बिलियात्स्की, रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनची मानवाधिकार संस्था सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केला आहे.


नोबेल पारितोषिकांच्या घोषणेला सोमवारी (3 ऑक्टोबर) स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार देऊन सुरुवात झाली. निअँडरथल डीएनएवरील शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या वर्षीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते
यानंतर मंगळवारी (4 ऑक्टोबर) भौतिकशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना ‘क्वांटम मेकॅनिक्स’ क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील 2022 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. बुधवारी (5 ऑक्टोबर) रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. यंदाही हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांच्या नावावर होता.

10 तारखेला अर्थशास्त्राच्या पुरस्काराची घोषणा
कॅरोलिन आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांच्या “अणूंचे विखंडन करून पदार्थ तयार करण्यासाठी” देण्यात आले. 2022 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांच्या नावावर आहे. आता 10 ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.