पहिल्या फेस्टीव्ह सेल मध्ये ४० हजार कोटींची ऑनलाईन विक्री

रेडसीर स्ट्रॅटीजी कन्सल्टिंगच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्ट नुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपलेल्या पहिल्या फेस्टीव्ह सेल मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म विक्रीत वर्षाच्या सरासरीत २७ टक्के वाढ झाली आहे. ई कॉमर्स कंपन्यांनी या काळात ५.७ अब्ज डॉलर्स म्हणजे ४० हजार कोटींच्या मालाची विक्री केली आहे. यंदाही यात फ्लिपकार्टने त्यांचे अव्वल स्थान कायम राखले आहे. तर दोन नंबरवर मिशोने ऑनलाईन ऑर्डर मध्ये आघाडी घेतली आहे.

या विक्रीत सर्वाधिक संखेने विकला गेलेला माल मोबाईल्स असून या विभागातील एकूण विक्रीत मोबाईल विक्रीचा वाटा ४१ टक्के आहे. रेडसीरचे सहभागीदार संजय कोठारी म्हणाले या पहिल्या फेस्टीव्ह सेल मध्ये दर तासाला ५६ हजार मोबाईल विकले गेले आहेत. फॅशन उत्पादने  विक्रीत २० टक्के वाढ होऊन ती ४८ टक्क्यांवर गेली आहे. या सर्व कंपन्या मध्ये फ्लिपकार्ट टॉप वर असून त्या नंतर मिशो, मिन्त्रा, शोप्सी या कंपन्या आहेत.

विशेष म्हणजे या पहिल्या फेस्टीव्ह सेल मध्ये दोन नंबर शहरातील ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीत मोठी आघाडी घेतली आहे. एकूण विक्रीच्या ६५ टक्के ग्राहक या टू टीअर शहरातील आहेत. त्यांच्या टक्केवारीत यंदा २४ टक्के वाढ दिसली आहे.