किंग चार्ल्स थर्ड, जून २०२३ मध्ये होणार राज्याभिषेक सोहळा

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर दोन दिवसात राजसिंहासनावर बसलेले किंग चार्ल्स थर्ड यांचा प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा म्हणजे कोरोनेशन सेरेमनी ३ जून २०२३ रोजी होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार हा समारंभ वेस्टमिन्स्टर अॅबे मध्ये होईल. मात्र राणीच्या राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा हा समारंभ छोटा आणि साधेपणाने होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरु झाली असून किंग चार्ल्स यांची पत्नी कॅमेला पार्कर बाउल्स यांना क्वीन कंसोर्ट मुकुट घातला जाईल. हा सोहळा होत असताना किंग चार्ल्स वयाची ७४ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे ते ब्रिटीश इतिहासात सर्वाधिक वयाचे गादीवर आलेले सम्राट ठरणार आहेत.

परंपरेनुसार ब्रिटनच्या पुढचा राजा एडवर्ड यांच्या सिंहासनावर बसेल. १६६१ मध्ये एडवर्ड किंग चार्ल्स द्वितीय नावाने सिंहासनावर आले होते. नवा राजा किंग चार्ल्स थर्ड नावाने ओळखला जाणार असून त्याला सेंट एडवर्ड मुकुट घातला जाईल. अगोदर वरिष्ठ पाद्री तेलाने अभिषेक करतील आणि नंतर राजाला आशीर्वाद देतील. त्यानंतर हा मुकुट राजाच्या मस्तकावर ठेवला जाईल.

यानंतर किंग चार्ल्स थर्ड आणि क्वीन ऑफ कंसोर्ट बकिंघमच्या बाल्कनीतून देशाला संबोधित करतील. हे भाषण देण्याअगोदर १० सप्टेंबरला चार्ल्स यांना युके व कॉमनवेल्थ चे सम्राट म्हणून घोषित केले गेले आहे.