लिओनेल मेस्सी घेणार फुटबॉलचा निरोप

जगातील बलाढ्य फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी या वर्षी कतार येथे होत असलेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेनंतर फुटबॉलला अलविदा करणार आहे. ३५ वर्षीय मेस्सी चा त्याच्या देशासाठी म्हणजे आर्जेन्टिना साठीचा हा पाचवा वर्ल्ड कप आहे. मेस्सीने फुटबॉल निवृत्तीची घोषणा सेबेस्टीयन विग्नोलो याच्या बरोबर झालेल्या एका मुलाखतीत केली असून कतार मधला आपला शेवटचा वर्ल्ड कप असेल असे त्याने सांगितले.

मेस्सी म्हणाला खेळातून निवृत्तीबाबतचा निर्णय त्याने पूर्वीच घेतला होता आणि तशी कल्पना टीमला दिली होती. मेस्सीने आर्जेन्टिना साठी आत्तापर्यंत चार वर्ल्ड कप खेळले आहेत. राष्ट्रीय टीम मध्ये त्याने २००५ मध्ये प्रवेश केला आणि आत्तापर्यंत १६४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ९० गोल केले आहेत. मेस्सी म्हणाला,’कतार मधील फिफा वर्ल्ड कपची प्रतीक्षा करतो आहे. थोडा नर्व्हस सुद्धा आहे. माझ्यासाठी हा शेवटचा विश्व कप कसा असेल यांचा विचार येतो आणि हा कप माझ्यासाठी चांगला ठरवा अशी इच्छा आहे.’ मेस्सी आपल्या देशासाठी म्हणजे आर्जेन्टिना साठी एकदाही वर्ल्ड कप जिंकून देऊ शकलेला नाही.

अर्थात मेस्सीचे एकूण फुटबॉल करियर उत्तम दर्जाचे राहिले आहे. त्याने कोपा अमेरिका खिताब २०१४ मध्ये आपल्या टीमला मिळवून दिला आहे. २०१४ च्या फिफा वर्ल्ड कप मध्ये सुद्धा आर्जेन्टिनाला विजयाची संधी होती आणि ही टीम अंतिम फेरीत पोहोचली होती. मेस्सीचा या स्पर्धेतील खेळ उत्तम होता पण त्यांना जर्मनी कडून पराभव पत्करावा लागला. अन्य स्पर्धा मध्ये मेसीची कामगिरी चांगली असून त्याने २०१४ फिफा, कोपा अमेरिका २०१५,२०२१ मध्ये सर्व श्रेष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळविला आहे. या वर्षी फिफा मध्ये चार वेळा सामनावीर आणि कोपा अमेरिकच्या एका सिझन मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर ठरून रेकॉर्ड नोंदविले आहे.