ब्रह्मास्त्र २ मधून डेब्यू करणार आर्यन खान?

शाहरुख, रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्रला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख पाच वर्षांच्या गॅप नंतर मोठ्या पडद्यावर दिसला आहे. या चित्रपटात त्याची भूमिका अगदी छोटी असली तरी प्रेक्षकांना ती खूपच पसंत पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मास्र दोन मधून शाहरुखची हीच भूमिका त्यांचा मुलगा आर्यन खान पुढे नेणार आहे. म्हणजेच याच चित्रपटातून आर्यन बॉलीवूड डेब्यू करणार आहे.

या चित्रपटात शाहरुखने कॅमिओ रोल केला आहे. सायंटिस्ट आणि वानरास्त्र अश्या या दोन भूमिका मध्ये शाहरुख सुरवातीलाच दर्शन देतो आणि येथेच त्याच्या भूमिकेचा शेवट होतो. सोशल मिडीयावर ब्रह्मास्त्र दोनची काही पोस्टर आर्यनच्या चाहत्यांनी पोस्ट केली आहेत. अर्थात ही चित्रपटाची अधिकृत पोस्टर नाहीत तर चाहत्यानीच तयार केली असून त्यात शाहरुखच्या वानरास्त्र भूमिकेत आर्यन दाखविला गेला आहे. आर्यन या भूमिकेत यंग वानरास्त्र म्हणून दिसावा अशी त्यांच्या चाहत्यांची मागणी आहे.

आर्यन खानच्या बॉलीवूड डेब्यूची चर्चा दीर्घकाळ होते आहे. आणि त्याचे चाहते त्याचा इंतजार करत आहेत. ड्रग प्रकरणात आर्यन याला आरोपी केले गेले तेव्हाही त्याचे चाहते त्यांच्या समर्थनार्थ सतत पुढे आले होते.