रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी, लँडलाइन नंबरवर आला कॉल


मुंबई – मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर हा धमकीचा कॉल आला, त्यानंतर सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री 12:57 वाजता एका अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. धमक्या देणाऱ्या व्यक्तीने अंबानी कुटुंबाच्या नावानेही धमकी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.