किस में कितना हैं दम… आजच्या दसरा मेळाव्यातून होणार स्पष्ट, दोन्ही गट शक्तिप्रदर्शनात व्यस्त


मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव आणि शिंदे गट आज दसरा मेळाव्यातून आपली राजकीय ताकद दाखवून देणार आहेत. बीकेसी येथे शिंदे आणि शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय येण्याच्या शक्यतेने पोलीस सतर्कतेच्या मूडमध्ये आहेत. कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये यासाठी कडक तयारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची आम्ही काळजी घेतली आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्तेही कायदा व सुव्यवस्था राखतील, याची मला खात्री आहे. सद्यस्थितीत गर्दीचा फायदा घेऊन समाजकंटकांनी अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करू नये, एवढीच काळजी आहे.

मुंबईच्या आसपासच्या भागातून बीकेसी मैदानाकडे जाणारे सर्व महामार्ग आणि रस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी पोस्टर आणि बॅनरने भरुन गेले आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये आपणच ‘ओरिजिनल’ शिवसेना असल्याचा दावा केला जात असून, त्यांच्या मेळाव्याकडे त्यांचे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे, हे विशेष. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बीकेसीमध्ये जोरदार तयारी
मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना गर्दी गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांना मुंबईत आणण्यासाठी 1800 बसेस बुक करण्यात आल्या आहेत. ठाण्यातील एका सुप्रसिद्ध मिठाईवाल्याला अडीच लाख फूड पॅकेट बनवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. मेळाव्याला येणाऱ्यांच्या जेवणाची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. बीकेसीमध्ये 3 लाख खुर्च्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिवाजी पार्कवरही जोरदार तयारी
शिवाजी पार्क येथील मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख नेत्यांची दादर येथील पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. शिवसेना म्हणते की शिवाजी पार्कचा मेळावा त्यांच्यासाठी नवीन नाही, ते दरवर्षी तिथे सभा घेतात.

वाहतूक पोलिस बंदोबस्त
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे येणाऱ्या अनेक बसेसच्या पार्किंगसाठी आवश्यक व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.