दिवाळीला 100 रुपयांना मिळणार रवा, तेल, साखर आणि हरभरा डाळीचे पाकीट, शिंदे सरकारचा निर्णय


मुंबई : दिवाळीपूर्वी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात सरकारने रेशनकार्डधारकांना दिवाळीपूर्वी भेट दिली आहे. दिवाळीदरम्यान शिधापत्रिकाधारकांना रवा, तेल, साखर, हरभरा डाळ स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या चार वस्तूंचे एक पाकीट रेशन दुकानात केवळ शंभर रुपयांना मिळणार आहे. दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिधापत्रिकाधारकांना ही भेट दिली आहे.

दुसरीकडे, मंगळवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लोकांसाठी 700 आरोग्य दवाखाने उघडण्याची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारचे हे 700 आरोग्य दवाखाने उघडले जातील, ज्यांना आपला दावाखाना म्हटले जाईल. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे महाराष्ट्र सरकारचे प्राधान्य आहे. यासोबतच ग्रामीण भागातील लोकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी शिंदे सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.