T20 विश्वचषक 2022 साठी ICC ने घोषित केले पंच आणि सामनाधिकारी, फक्त एका भारतीयाला मिळाले स्थान


या महिन्यापासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T20 विश्वचषक 2022 साठी ICC ने सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. याची घोषणा करत आयसीसीने मॅच रेफरीसह एकूण 20 अधिकाऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये 16 पंचांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत 4 सामनाधिकारी असतील. आयसीसीने निवडलेल्या 16 पंचांमध्ये भारताकडून नितीन मेनन यांना स्थान मिळाले आहे. नितीन आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग आहेत. ते ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.

ICC ने या मेगा टूर्नामेंटच्या पहिल्या फेरीसाठी आणि सुपर 12 साठी 20 मॅच ऑफिसर्सची घोषणा केली आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. आयसीसीने सांगितले की, T20 विश्वचषकाच्या आठव्या सत्रात श्रीलंकेचा रंजन मदुगले, झिम्बाब्वेचा अँड्र्यू पायक्रॉफ्ट, इंग्लंडचा ख्रिस्तोफर ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून सामनाधिकारी म्हणून काम पाहतील.

T20 विश्वचषक 2022 साठी सामनाधिकारी
अँड्र्यू पायक्रॉफ्ट, क्रिस्टोफर ब्रॉड, डेव्हिड बून आणि रंजन मदुगले

T20 विश्वचषक 2022 साठी पंच
एड्रियन होल्डस्टॉक, अलीम दार, अहसान रझा, क्रिस्टोफर ब्राउन, क्रिस्टोफर गफानी, जोएल विल्सन, कुमारा धर्मसेना, लॅंग्टन रस्सेरे, मराइस इरास्मस, मायकेल गफ, नितीन मेनन, पॉल रीफेल, पॉल विल्सन, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, रॉडनी टुकर.