या कंपन्यांचाही मालक आहे मार्क झुकेरबर्ग

फेसबुक सर्वाना परिचित असलेली सोशल मिडिया साईट असून तिचा वापर जगभरात सर्वत्र केला जातो. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग, लहान वयात जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत समाविष्ट झाला आणि त्याचे घर, पत्नी, मुले, संपत्ती या विषयी सतत चर्चा होत असते. पण मार्क केवळ फेसबुकचाच मालक नाही तर गेल्या काही वर्षात अश्या पाच कंपन्याचे फेसबुकने  अधिग्रहण केले आहे.

यातील इन्स्टाग्राम आणि व्हॉटस अप या दोन मुख्य कंपन्या आहेत. ब्रायन अॅक्टन व जॅन कोअम यांनी २००९ मध्ये लॉंच केलेल्या व्हॉटस अपचे फेसबुकने केलेले अधिग्रहण महत्वाचे ठरले आणि त्यासाठी फेसबुकने १९ अब्ज डॉलर्स मोजले होते. २०१४ मध्ये हा व्यवहार झाला. इन्स्टाग्रामपेक्षा हे अधिग्रहण २० पट अधिक होते असे म्हणतात.

बेलुगा या लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिसची खरेदी ही साईट लाँच झाल्यावर आठ महिन्यांनी फेसबुकने केली. २०१० मध्ये बेलुगा सुरु झाले होते. ओनावो ही इस्त्रायल मोबाईल वेब अॅनालेटीकल वेब कंपनी २०१० मध्ये गाय रोसेन व रॉय टायगर यांनी सुरु केली होती.२०१३ मध्ये फेसबुकने ती १२० दशलक्ष डॉलर्सला विकत घेतली. ओक्युलस व्हीआर ही व्हर्च्युअल रीअॅलिटी हार्डवेअर आणि सोफ्टवेअर कंपनी आहे. गेमिंग शौकिनांना तिच्याविषयी माहिती आहे. २०१२ मध्ये पामर लक्की, ब्रेंडन इरीबे, नॅट मिशेल आणि मायकल एन्तानोव्ह यांनी कॅलिफोर्निया मध्ये सुरु केलेली ही कंपनी फेसबुकने २०१४ मध्ये २ अब्ज डॉलर्स ना खरेदी केलेली आहे.