मालिका जिंकल्यानंतरही तणावात आहे रोहित शर्मा, डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीबाबत म्हटले असे


टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. भारताने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने त्यांच्या भूमीवर टी-20 मालिकेत पाहुण्या संघाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघाच्या डेथ बॉलिंगबाबत तणावात आहे.

गुवाहाटीतील दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा डेथ बॉलिंगबद्दल म्हणाला, खरे सांगायचे तर या (डेथ बॉलिंग) विभागात थोडी काळजी आहे, कारण आम्ही चांगली गोलंदाजी करत नाही. हे असे क्षेत्र आहे, जिथे आम्हाला आव्हान मिळते. काळजी करण्यासारखी फारशी गरज नाही, पण आपण स्वतःला वर उचलले पाहिजे.

यादरम्यान रोहित टीम इंडियाच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनाबद्दल खूप सकारात्मक दिसत होता. तो म्हणाला, आम्हाला संघात हेच हवे आहे, असे आम्ही सर्व मानतो. हा दृष्टीकोन संमिश्र परिणाम देतो, परंतु आम्ही त्यासह पुढे जाऊ. पूर्वी प्रत्येकाला संधी मिळावी आणि आपापले काम करावे हा वैयक्तिक फोकस होता, पण आता आपण त्याही पलीकडे गेलो आहोत.

टीम इंडियाने मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी
गुवाहाटी T20 मध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अव्वल आणि मधल्या फळीतील धुरंधर फलंदाजीमुळे निर्धारित 20 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 237 धावा केल्या. केएल राहुल (57), रोहित शर्मा (43), विराट कोहली (49) आणि सूर्यकुमार यादव (61) यांनी शानदार खेळी खेळली. प्रत्युत्तरात, डेव्हिड मिलर (106) आणि क्विंटन डी कॉक (69) यांच्या खेळी केली पण ते लक्ष्यापासून 16 धावा दूर राहिले. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही 8 गडी राखून जिंकला. अशा स्थितीत या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.