गेली ४१३ वर्षे येथे होतेय पारंपारिक दुर्गा पूजा

युनेस्कोने दुर्गापुजेला त्यांच्या विशेष यादीत स्थान दिले आहे आणि बंगालची दुर्गापूजा जगभरात प्रसिद्ध आहे. मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. बंगालमधील सर्वात जुनी दुर्गा पूजा सबरना रॉय चौधुरी परिवारात साजरी होते. गेली ४१३ वर्षे ही परंपरा सुरु आहे. येथे आजच्या पद्धतीप्रमाणे भडक सजावट आणि दरवर्षी नवी थीम नसते तर पारंपारिक पद्धतीने ही पूजा केली जाते. ज्या ठिकाणी ही पूजा होते त्याचे कनेक्शन मोगलांशी आहे. कारण ज्या जमिनीवर दुर्गेचा पंडाल उभारला जातो ती जमीन या कुटुंबाला मोगल सम्राट जहांगीर याने दान दिलेली आहे.

मोगल दरबारी असलेल्या राजा मानसिंग यांच्या मध्यस्तीतून ही जमीन दान मिळाली असून गेल्या ३५ पिढ्या येथे हा उत्सव साजरा करत आहेत. रॉय चौधरी यांच्याकडे हा विशेषाधिकार आहे.संस्थापक लक्ष्मीकांत गंगोपाध्याय सबरना चौधरी यांची ३५ वी पिढी आहे. लक्ष्मीकांत हे २२ व्या पिढीचे वंशज आहेत. या कुटुंबाचे हजारो म्हणजे सुमारे २० हजार वंशज जगभर असून सबरना त्यांचे संयुक्त सचिव आहेत.

असे सांगतात १५७० मध्ये जिया यांच्या पत्नी पद्मावती यांच्या पोटी लक्ष्मीकांत यांचा जन्म झाला पण लगेच पद्मावती यांचा मृत्यू झाला त्यामुळे जिया यांना वैराग्य आले. ते तपस्वी बनले आणि कालीघाट येथील पुजाऱ्याच्या हाती लक्ष्मीकांत यांना सोपवून ते वाराणसी येथे तप करू लागले. तेव्हा अकबराचा सेनापती राजा मानसिंग त्यांचे शिष्य बनले. गुरु जिया यांना कसलाच मोह नव्हता यामुळे राजा मानसिंग यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने वरील जमीन दान म्हणून दिली आणि त्यांना रॉय चौधरी पदवी दिली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १६१० सालापासून लक्ष्मीकांत यांनी दुर्गा पूजा उत्सव सुरु केला. सुरवातीपासूनच ही पूजा धर्मनिरपेक्ष असल्याने येथे हिंदू मुस्लीम दर्शनाला येतात. मोगलांनी भेट म्हणून दिलेल्या अनेक वस्तू, अंगठ्या, तलवारी, चांदी नाणी, अत्तर कुप्या, जेवण विषारी नाही ना हे तपासणारे भांडे आजही त्यांच्या संग्रही आहे.