जिओची फाईव्ह जी कनेक्टेड अँब्यूलंस सादर

इंडियन मोबाईल कॉंग्रेस मध्ये रिलायंस जिओने फाईव्ह जी कनेक्टेड खास अँब्युलंस सादर केली आहे. यात अशी व्यवस्था आहे कि मेडिकल इमर्जन्सी मध्ये रुग्णाला हॉस्पिटल मध्ये नेण्याच्या अगोदरच रूग्णासंदर्भात महत्वाची माहिती त्या हॉस्पिटल मध्ये पोहोचेल आणि त्यानुसार रुग्ण दाखल होण्यापूर्वीच त्याच्यावर कराव्या लागणाऱ्या उपचारांची तयारी झालेली असेल. यामुळे विना विलंब रुग्णावर उपचार सुरु करता येतील.

जिओ पॅव्हेलीयन ही अशी रोबोटिक आर्म आहे त्यात एक्स रे, सोनोग्राफी करता येतील. जिओ ट्रू फाईव्ह जी मध्ये शेकडो मैल दूर असलेला रेडीऑलोजिस्ट अथवा सोनोग्राफी तज्ञ रोबोटिक आर्म चालवून ग्रामीण रुग्णाशी भेट घडवून आणू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना अश्या तपासण्या करण्यासठी शहरात येण्याची गरज राहत नाही.

रिलायंस, फाईव्ह जी कंट्रोल रोबो तंत्रावर काम करत असून आयसोलेशन वॉर्ड सह अन्य रुग्णांना औषधे आणि जेवण पोहोचविण्याचे काम रोबो करतील. क्लाउड बेस्ड फाईव्ह जी कंट्रोल रोबोच्या वापरामुळे अचूक काम होईलच पण सॅनिटायझेशन मानवी कामगारांपेक्षा अधिक चांगले आणि जलद होऊ शकेल. यामुळे हजारो फ्रंट लाईन वर्कर्स व रुग्णांचा जीव वाचू शकेल असे म्हटले जात आहे.