Womens Asia Cup : आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात, पहिल्या सामन्यात श्रीलंकेला चारली धूळ


2022 च्या महिला आशिया कपमध्ये भारतीय महिला संघाने विजयाने सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला होता. सिल्हेटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम खेळून 20 षटकात 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 18.2 षटकांत अवघ्या 109 धावांत सर्वबाद झाला.

भारतीय संघासाठी प्रथम जेमिमा रॉड्रिग्जने 76 धावांची शानदार खेळी केली आणि त्यानंतर दयालन हेमलता, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी गोलंदाजीत कमाल केली. हेमलताने तीन बळी घेतले. त्याचबरोबर दीप्ती आणि पूजा यांना प्रत्येकी दोन बळी मिळवले.