Twitter : भारतात एका महिन्यात पाकिस्तान सरकारचे दुसऱ्यांदा खाते बंद, कायदेशीर मागणीनंतर कारवाई


नवी दिल्ली – पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात पुन्हा एकदा ब्लॉक करण्यात आले आहे. याचा अर्थ आता पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात उघडणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या कायदेशीर मागणीनंतर ट्विटर इंडियाने हे पाऊल उचलले आहे. याआधी 7 सप्टेंबर रोजी पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवरही बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलचे नाव @GovtofPakistan आहे. सध्या भारतात यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे त्यावर लिहिलेल्या गोष्टी सध्या भारतात दिसणार नाहीत.

कायदेशीर मागणी केल्यानंतर केली जाते कारवाई
भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ट्विट किंवा ट्विटर अकाऊंटच्या सामग्रीवर लागू होऊ शकणारे कायदे आहेत. Twitter ला कोणत्याही देशाकडून किंवा संस्थेकडून कायदेशीर विनंती प्राप्त झाल्यास, वेळोवेळी त्या विशिष्ट देशातील विशिष्ट सामग्रीचा प्रवेश अवरोधित केला जातो. याआधीही पाकिस्तानचे काही ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यानंतर पाकिस्तानने यावर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान सरकारनेही याला विरोध केला.