Jawa 42 Bobber Launched : Jawa ची नवीन बाईक 42 Bobber लॉन्च, जाणून घ्या किंमत ते खासियत


शक्तिशाली दुचाकी निर्माता कंपनी जावाने आपली नवीन मोटरसायकल 42 बॉबर देशात लॉन्च केली आहे. या बाइकला अनेक फीचर्ससह उत्कृष्ट लुक देण्यात आला आहे. ही बाईक एकूण तीन रंगांमध्ये बाजारात आणली गेली आहे, ज्याच्या किंमतीही वेगळ्या आहेत.

याच्या मिस्टिक कॉपर कलरची एक्स-शोरूम किंमत 2.06 लाख रुपये, मून स्टोन व्हाइट कलरची एक्स-शोरूम किंमत 2.07 लाख रुपये आणि जॅस्पर रेडची एक्स-शोरूम किंमत 2.09 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बाइकमध्ये 334cc इंजिन देण्यात आले आहे. यासोबतच यात २-वे अॅडजस्टेबल सीटही देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या नवीन बाईकची खासियत.

जावा 42 बॉबरचे इंजिन
ही बाईक नवीन रेट्रो रोडस्टर स्टाईलमधील आगामी Jawa 42 बाईकप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे. 42 बॉबरचा लो-स्लंग बॉडी आणि सिंगल सीट लुक जावा 42 ची आठवण करून देतो. दोघांचा लूक आणि स्टाइल बर्‍यापैकी सारखी दिसते. या नवीन बाईकमध्ये 334cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 30.64hp ची कमाल पॉवर आणि 32.64 न्यूटन मीटर कमाल टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हेच इंजिन कंपनीच्या पेराक मॉडेलमध्येही उपलब्ध आहे. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

जावा 42 बॉबरची वैशिष्ट्ये
जावा 42 बॉबरला मागील बाजूस एक लहान लगेज रॅक, सुधारित लूक, हेडलाइट आणि इन्स्ट्रुमेंटेशनसह नवीन सीट मिळते. तसेच, यामध्ये उत्तम राइडिंगसाठी ABS कॅलिब्रेशन सुधारण्यात आले आहे. Jawa 42 Bobber ला LED लाइटिंगसह LCD डिस्प्ले मिळतो, तर त्याचे टेल-लॅम्प पेराकपेक्षा वेगळ्या पद्धतीने डिझाइन केले गेले आहेत.