Adipurush Teaser Poster : आदिपुरुषचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज, रामच्या भूमिकेत शोभून दिसतो प्रभास


साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन हे सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून लोकांमध्ये उत्सुकतेचे कारण आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांची निराशा कमी करत निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास रामच्या भूमिकेत धनुष्य धरलेला दिसत आहे. त्याचा हा लूक खूपच चांगला आहे.

चित्रपटाचे हे फर्स्ट लूक पोस्टर अभिनेता प्रभासने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. निर्मात्यांनी पाच भाषांमध्ये चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, आरंभ. अयोध्या, यूपी मधील सरयू नदीच्या काठावर जादुई प्रवास सुरू करण्यासाठी आमच्यात सामील व्हा. आमच्या आदिपुरुष चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:11 वाजता अयोध्येत अनावरण करण्यात येईल. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. याआधी या चित्रपटाचा टीझर उत्तर प्रदेशातील प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर 2 ऑक्टोबर रोजी अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर असलेल्या रामाच्या शहरात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, आदिपुरुष हा रामायणापासून प्रेरित पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास भगवान रामाची म्हणजेच आदिपुरुषची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागे हनुमानाची तर सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारणार आहे. पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट 12 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.