चीनने २१ देशात उघडल्या बेकायदा गुप्त पोलीस चौक्या?

देशाला शक्तिमान बनविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या चीनने जगभरातील २१ देशात बेकायदा गुप्त पोलीस चौक्या तयार केल्याचे वृत्त आहे. चीन मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप रोजच जगातील अनेक नेते करत आहेत. शिबिरातून कैद केलेले उदगर मुस्लीम, जबरदस्ती केल्या जाणाऱ्या नसबंदी, कुटुंबापासून लोकांना वेगळे करणे अश्या अनेक कारणावरून चीन वर सातत्याने आरोप केले जात आहे.

इन्व्हेस्टिगेशन जर्नालीझम रिपोर्टिंका नुसार चीनने कॅनडा, युक्रेन, फ्रांस, स्पेन, जर्मनी, युके, अश्या २१ देशात पोलीस ठाणी खोलली असून त्यांना पब्लिक सिक्युरिटी ब्युरो, किंवा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर असे म्हटले जात आहे. येथून जेथे जेथे चीन विरोधी वक्तव्ये केली जात आहेत किंवा चीनच्या कार्यपद्धतीला विरोध केला जात आहे त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि हा विरोध मोडून काढणे अशी कामे केली जात आहेत. या गुप्त ठाण्याचा काही देशातील निवडणुकांवर सुद्धा प्रभाव पडत असल्याचे सांगितले जात आहे. २१ देशात अशी ३० ठाणी सध्या कार्यरत आहेत.