शाहीद कपूर नव्या घरात, ५८ कोटींचे आहे हे घर

बॉलीवूड मधील लोकप्रिय कपल म्हणून शाहीद कपूर आणि मीरा कपूर ओळखले जातात. सोशल मिडीयावर त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. शाहीद याने त्यांच्या जुन्या सीफेसिंग जुहू येथील घरातून वरळीच्या अलिशान डुप्लेक्स घरात स्थलांतर केले आहे. ३६० वेस्ट असे या इमारतीचे नाव असून शाहीद याला येथे सहा पार्किंग मिळाली आहेत. या घराला ५०० चौरस फुटांची बाल्कनी आहे.

शाहीदची पत्नी मीरा हिला घर सजावटीची खूप आवड आहे त्यामुळे तिने तिच्या मार्गदर्शनाखाली घराची हवी तशी सजावट करून घेतली आहे. पिंकव्हिलाच्या बातमीनुसार मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाहीद आणि मीरा यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला होता. हे घर त्यांनी २०१८ मध्येच बुक केले होते आणि २०१९ मध्येच त्यांना घराचा ताबा मिळाला होता. पण घर सजावटीचे काम करोना मुळे लांबले आणि आता ते काम पूर्ण झाल्यावर ही जोडी नवीन घरात मुलांसह आली आहे.

शाहीद लवकरच डिजिटल डेब्यू करत आहे. कृष्ण डी के आणि राज निदिमोस दिग्दर्शीत ‘फर्जी’ मध्ये शाहीदचे दर्शन होणार आहे. हा थ्रिलर चित्रपट असून त्यात शाहीद सोबत कृती सेनन आणि नवाजुद्दिन महत्वाच्या भूमिकेत आहेत.